Latur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: HIV बाधित मुलीवर बलात्कार, नामांकित संस्थेतील धक्कादायक प्रकार; लातूर हादरले

Latur Crime: HIV बाधित मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. एका नामांकित संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Priya More

लातूरमध्ये एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका नामांकित एचआयव्ही बाधित संस्थेमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिचा गर्भपात करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातुरच्या औसा तालुक्यातील एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्थेमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची तक्रार मुलींनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. औसा तालुक्यातील या नामवंत संस्थेला अनेक पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT