Latur ST Bus Accident : लातुरात एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटून भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

लातुरात एसटी बस उलटल्याची घटना घडली आहे.
Latur Accident News
Latur Accident News Saam Tv

Latur Accident News : लातुरात एसटी बस उलटल्याची घटना घडली आहे. लातुर-पुणे एसटी बस मुरुड जवळच्या बोरगावकाळे इथं उलटली आहे. एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस पुलाखाली जात उलटली . आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Latur Accident News
Pune Crime : पोटात दुखल्याने मुलीला दवाखान्यात नेले, डॉक्टरच्या माहितीनंतर कुटुंब हादरलं; धक्कादायक बाब आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-पुणे एसटी बस मुरुड जवळच्या बोरगावकाळे इथं उलटली आहे. एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस पुलाखाली जात उलटली आहे. आज, मंगळवारी सकाळी दहा वाजणाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली.

एसटी बसच्या (ST Bus) अपघातात एसटीमधील ३० प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीररित्या जखमी झालेल्या १४ जणांना लातुरच्या शासकीय रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. काही जखमी प्रवाश्यांवर मुरुड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Latur Accident News
Nagpur Metro Ticket Price: नागपूर मेट्रोत ५ रुपयांत करता येणार प्रवास; चेक करा तिकीटांचे दर

लातूर-मुरुड हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लातूर डेपोची ही बस पुणे-वल्लभनगरकडे आज सकाळी निघाली होती.

बोरगावकाळे जवळ आल्या नंतर अरुंद रस्त्यावर पुढून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याखाली जाऊन उलटली. या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com