धक्कादायक! भरधाव कारची उभ्या बाईकला धडक, पाहा हा भीषण अपघात दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

धक्कादायक! भरधाव कारची उभ्या बाईकला धडक, पाहा हा भीषण अपघात

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा पाटीनजीक रात्री उशिराच्यावेळी कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील सरपंच पदमिनबाई सुग्रीव उसनाळे यांचे चिरंजीव बालाजी उसनाळे हे निलंगा येथील आडत व्यापारी असून ते सायंकाळी गावाकडे निघाले होते. अनसरवाडा पाटीजवळ त्यांच्या शेताच्या लगत निलंग्याकडून येत असलेल्या भरधाव कारचा ताबा सुटल्यामुळे बालाजी यांच्या मोटरसायकलवर जोरात येऊन आदळली आहे.

हे देखील पहा-

यात कारला अडकून दुचाकीसह ते जवळपास ५० ते ६० फुट फरफटत गेले आहेत. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात बालाजी ताकनाटे (रा. कलमुगळी) यांचा रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

तर गहिनीनाथ व्यंकट गोबाडे आणि महादेव तात्याराव वाघमारे (रा. कलमुगळी) यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अनसरवाडा गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT