पुणे : पुण्यामधील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले MLC Anil Bhosale यांच्यासह ७ जणांवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या Shivajirao Bhosale Bank ४९६ कोटी ४४ लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात ८ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हे देखील पहा-
आरोपींनी नियोजनबद्ध कट करून, कर्जदार आणि गुंतवणूकदारांची ४९६ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसलेंसहीत ७ जण अटकेत आहेत. सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासहीत १६ जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात या विषयी फिर्याद दिलेली होती.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.