Pankaja Munde Ahmednagar Vidhan Sabha News Saamtv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: 'मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल', लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचे मोठे विधान; निशाण्यावर कोण?

Beed Loksabha Election Result: 'लोकसभा निवडणुकीत मी निवडून आले असते तर आज हिरो झाले असते. मी हिरो झालेलं कसं कुणाला आवडेल?' असे सर्वात महत्वाचे आणि मोठे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे त्यांचा निशाणा कोणावर होता? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. १८ जून २०२४

पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकांमधील पराभव जिव्हारी लागल्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन मुंडे या तरुणाने आत्महत्या केली होती. आज या मृत तरुणाच्या कुटुंबाची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभा लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मी निवडून आले असते तर आज हिरो झाले असते. मी हिरो झालेलं असं कसं कुणाला आवडेल? मलाच काहीतरी द्या यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेसाठी तिकीट जाहीर झाल्यानंतर मला समजलं. मोदीजी पंतप्रधान होतील, देशाचं चांगल होईल, या भावनेने मी लोकसभेच्या रिंगणात उतरले, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

इशाऱ्याकडे लक्ष ठेवा..

"सगळं सोडून घरी बसायचं असेल तर ही विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. पहिल्यावेळी पाच वर्ष वाट पाहावी लागली आता दोनच वर्ष आहेत. ९० दिवस जीव लावा, फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यांच्या या विधानामुळे त्या विधानसभेच्या तयारीत आहेत का? अशाही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

"भाग्य लिहिताना कठीणच लिहले आहे. नाहीतर सत्तेत असलेल्या राजा महाराजा परिवारात साहेबांचा जन्म आणि माझा जन्म झाला असता, वरच्या वर्गात जन्माला घातले असते. मात्र आम्हाला कष्ट करणाऱ्याच्या वर्गात जन्माला घातला आहे. तिथेच सांगितले आहे तुमचे आयुष्य साधं नाही, असे म्हणत तुम्ही असे टोकाचे निर्णच घेऊ नका, मी घरी बसू का? अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT