Manoj jarange Patil: 'लक्ष द्या नाहीतर विधानसभेला एकालाही मतदान नाही', मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना इशारा, VIDEO पाहा

Manoj jarange Patil Press Conference: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याबाबत सरकारने खात्री द्यावी' अशी मागणी करत जालन्यामधील वडुगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.
Manoj jarange Patil: 'लक्ष द्या नाहीतर विधानसभेला एकालाही मतदान नाही', मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना इशारा!
Manoj Jarange PatilSaam TV

छत्रपती संभाजीनगर, ता. १८ जून २०२४

एकीकडे सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असतानाच ओबीसी नेत्यांनीही उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याबाबत सरकारने खात्री द्यावी' अशी मागणी करत जालन्यामधील वडुगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण 13 तारीख दिली आहे. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आरक्षण हवं हे दहा महिन्यापासून म्हणत आहे. 13 जुलैच्या आधी सर्व दाखल गुन्हे मागे घ्यायला हवेत. आठ ते नऊ विषय आम्ही शंभूराजे यांना सांगितले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माहित विषय आहे, १३ जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"त्यांना आरक्षण असताना ते एवढे लढत आहेत तर आम्हाला आरक्षण नसताना किती लढावे? आरक्षण असणारे लोक असे लढायला लागले, माझ्या मराठ्यांना आरक्षणच नाही. तुम्हाला आरक्षण असताना मिळू नये म्हणून तुम्ही एवढे लढता, तर आम्हाला मिळायच म्हणून आम्ही किती लढावे ? आपण काय फक्त उघड्या डोळ्यांनी पाहता का?" असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी उपोषणावर टीका केली.

Manoj jarange Patil: 'लक्ष द्या नाहीतर विधानसभेला एकालाही मतदान नाही', मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना इशारा!
VIDEO : वर्धापनदिनाआधीच ठाकरे- शिंदेंमध्ये सामना! 'आमची खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी स्वतःला आरशात पाहावं', संजय राऊतांचा टोला

मराठा नेत्यांना इशारा

"मराठा नेत्यांनी इकडे लक्ष द्या नाहीतर विधानसभेत एकालाही मदत करणार नाही. मराठा आंदोलकांच्या पाठीशी उभे राहा नाहीतर तुमचे दारात येणे बंद करु, सर्व आमदारांनी समाजाच्या पाठीशी उभे राहायला हवे, ओबीसी आमदारांनाही आम्ही मतदान करतो. आवाज उठवणे आमदाराचे काम आहे अन्यथा मराठा दारात उभा करू देणार नाही. अधिवेशनात मुद्दा मांडा. कोण पत्र द्यायला येत नाही याकडे मराठा लक्ष देत आहोत," असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj jarange Patil: 'लक्ष द्या नाहीतर विधानसभेला एकालाही मतदान नाही', मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना इशारा!
Laxman Hake Hunger Strike: तोडगा नाहीच! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारशी चर्चेस नकार; उपोषणाचा आज सहावा दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com