Maharashtra Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Latur News: १५ वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात असल्याचा पालकांचा आरोप

Maharashtra Latest News: लातूरमध्ये पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीने वसतीगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. ३० जून २०२४

लातूरमध्ये पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीने वसतीगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मुलीच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर शहरात पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने राहत असलेल्या वसतीगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने विद्यार्थिनीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबाने आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठी गर्दी केली आहे.

या प्रकरणी मुलीच्या पालकांनी आक्रमक भूमिका घेतली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली आहे. मात्र गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. तर दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे

जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी देखील भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा मृत्यू होऊन 48 तास झाले आहेत तरी देखील नातेवाईक मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: 'या' ५ सवयी अंगीकारा आणि जीवनात मिळवा मोठे यश

Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची संधी, ७५० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

Suyash Tilak : मराठमोळ्या अभिनेत्याच्या गाडीचा अपघात; तासाभराने मिळाली मदत, पाहा VIDEO

Buldhana Shivsena Melava : शिवसेना मेळाव्याच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाड नाराज? बुलढाण्यात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT