Latur Breaking News:
Latur Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Latur News: भाग्यश्री सुडे हत्या प्रकरण: संतप्त लातूरकरांचा निषेध मोर्चा; आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. १२ एप्रिल २०२४

Bhagyashree Sude Death Case:

९ लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयात शिकणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करुन निर्घृण हत्या केल्याची घटना पुण्यात घडली होती. या भयकंर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या घटनेमध्ये हत्या झालेली तरुणी ही लातूरमधील असून या घटनेविरोधात आज लातूरकरांनी निषेध मोर्चा काढत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मूळची लातूरची असलेली कु. भाग्यश्री सुडे ही पुण्यामध्ये (Pune) इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत होती. ३० मार्च रोजी भाग्यश्रीची तिच्याच मित्राकडून ९ लाखांची खंडणी उकळण्यासाठी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून लातूरकरांकडून रस्त्यावर उतरुन निषेध केला जात आहे.

भाग्यश्री सुडे हत्या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी. तसेच उज्वल निकम यांच्यासारखे निष्णात वकीलांनी बाजू मांडावी, असे म्हणत आमच्या लेकीला न्याय द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये नुकत्याच भाजप गेलेल्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या सहभागी झाल्या होत्या.

काय आहे प्रकरण?

लातूरची भाग्यश्री सुडे ही पुण्यामध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. भाग्यश्रीचे ३० मार्च रोजी तिच्या मित्रानेच बाहेर जेवायला जायचे आहे, असे सांगत अपहरण करण्यात आले. त्याचदिवशी तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भाग्यश्रीचा मित्र शुभम फुलावळे याच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. (Crime News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

SCROLL FOR NEXT