Nashik Loksabha: महायुतीत नाशिकचा तिढा सुटणार! हेमंत गोडसे, भुजबळांऐवजी नव्या नावाची चर्चा; कोण आहेत अजय बोरस्ते?

Ajay Boraste Nashik Loksabha News: महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरुन तिढा अद्याप कायम आहे. आता गोडसे आणि छगन भुजबळ यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Nashik Loksabha Constituency News:
Nashik Loksabha Constituency News: Saamtv

Nashik Loksabha Constituency News:

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरुन तिढा अद्याप कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा लढण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता गोडसे आणि छगन भुजबळ यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Maharashtra loksabha Election)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकच्या जागेसाठी जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. अजय बोरस्ते यांच्या नावाची गेल्या 4-5 दिवसांपासून चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांना ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजय बोरस्ते यांना बोलावणे आले असून अजय बोरस्ते ठाण्याकडे रवाना झाले आहेत.

आज ११ वाजेपर्यंत अजय बोरस्ते हे ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या (CM EKnth Shinde) निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता लवकरच महायुतीकडून नाशिक लोकसभेचा तिढा सुटणार असून अजय बोरस्ते यांचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे.

Nashik Loksabha Constituency News:
Nitesh Rane : जिथे कमी लीड तिथे निधीही कमी देणार, तक्रार करायची नाही; नितेश राणेंचा मतदारांना इशारा की धमकी?

कोण आहेत अजय बोरस्ते?

अजय बोरस्ते हे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवसेना पक्ष फुटीआधी ते नाशिक महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते होते. त्याचबरोबर नाशिक महापालिकेचे शिवसेनेचे माजी उपमहापौर, शिवसेनेचे तत्कालीन नाशिक महानगर प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महापालिकेतील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. मागील १७ ते १८ वर्षात महानगर प्रमुख, नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Loksabha Constituency News:
Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील ३ दिवस अवकाळीचा इशारा, मुंबईत उकाडा कायम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com