Latur Latest News Saamtv
महाराष्ट्र

Latur News: तहसीलदार साहेब झाले चालकाच्या गाडीचे सारथी; अनोख्या निरोप समारंभाची होतेय सर्वत्र चर्चा

Latur Latest News: आपल्या सहकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी दिलेला हा सन्मान आणि आगळा वेगळा निरोप पाहून चालक गोविंद शिनगारे यांना अश्रू अनावर झाले होते. या सेवानिवृत्ती सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Gangappa Pujari

संदीप भोसले, लातूर|ता. २ फेब्रुवारी २०२४

Latur Breaking News:

प्रत्येक शासकीय नोकरदाराच्या सेवानिवृत्तीचा दिवस हा भावनिक दिवस असतो. हा दिवस खास व्हावा, सदैव आठवणीत राहावा अशी प्रत्येकाची इच्छा देखील असते. असाच एक अगदी खास समारंभ लातूरमध्ये पार पडला. या आगळ्या वेगळ्या निरोप समारंभाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

गोविंद शिंनगारे हे लातूरच्या तहसील कार्यालयात ३३ वर्षांपासून चालक पदावर कार्यरत होते. आज (२, फेब्रुवारी) गोविंद शिंनगारे हे पदावरुन मुक्त झाले. त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तहसीलदार तसेच इतर सहकारी, अधिकाऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत खास निरोप दिला. यावेळी वाजत गाजत निरोप देताना सर्व सहकारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी गोविंद शिनगारे यांचा सपत्नीक सत्कार देखील केला आहे. तसेच दररोज ते तहसीलदारांची जी शासकीय गाडी चालवाचे , ती गाडी फुलांनी सजवून, स्वतः तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ती गाडी चालवत गोविंद शिनगारे आणि त्यांच्या पत्नीला घरापर्यंत सोडले.

दरम्यान, आपल्या सहकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी दिलेला हा सन्मान आणि आगळा वेगळा निरोप पाहून चालक गोविंद शिनगारे यांना अश्रू अनावर झाले होते. या सेवानिवृत्ती सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT