Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं!
Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : गेल्या महिन्यात मराठवाड्यात पावसानं अक्षरशः कहर केला होता. लातुर जिल्ह्याची सोयाबीनचे कोठार अशी ओळख, पण याच पावसानं महापुराच रुप धारण केलं अन होत्याच नव्हतं झालं. राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असल्याने औसा येथील भाजपाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी आज सकाळी औसा ते तुळजापूर शेतकऱ्यांसह पायी यात्रा काढली आहे.

हे देखील पहा :

सन 2019 मध्ये सरकारमध्ये असलेली व्यक्ती हेक्टरी 50 रुपयांची मदत अस सांगत होते. आता त्यांनी फक्त हेक्टरी 10 रुपयांची मदत केली आहे शेतातील सोयाबीन काढण्यासाठी एका बॅगला 5 हजार मजुरी लागत आहे. शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करायची आहेत.

अडचणीत असणाऱ्या शेतकऱयांना अधिकची मदत मिळावी, याकरता राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी आई तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी ही पायी यात्रा काढली असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे. या पायी यात्रेत प्रभारी जिल्हाध्यक्ष संतोष मुक्ता, ऍड मुक्तेश्वर वागदरे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव शहराध्यक्ष लहु कांबळे, जिल्हा सरचिटणीस किरण उटगे, फईम शेख, शैलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leftover Frying Oil : तळून उरलेल्या तेलाचा 'या' कामांसाठी होतो उपयोग

Today's Marathi News Live : मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरातील महिला पत्रकाराला धमकी, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

Kalyan Crime News : तब्बल 150 सीसीटीव्हीची तपासणी, 46 क्रमांक पाहताच पाेलिसांनी महागड्या बाईक चाेरणा-याला केलं जेरबंद

kitchen Hacks: गव्हाच्या पिठात किडे होतात ? हे भन्नाट उपाय करा, राहिल वर्षभर फ्रेश

Makhana Benefits : रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

SCROLL FOR NEXT