latur News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Latur News : लातूर-लामजना महामार्गावर कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन तीन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • निलंगा तालुक्यातील करजगाव पाटीजवळ भीषण अपघात

  • सरवडी गावातील तिन्ही तरुणांचा मृत्यू

  • कारची दुचाकीला जोरदार धडक, दोन जागीच मृत्यू

  • घटनेनंतर गावात शोककळा, पोलिसांचा तपास सुरू

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. शनिवारी उशिरा रात्री लामजना महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेत सरवडी गावातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोन तरुणांचा जागीच प्राण गेला, तर तिसऱ्या तरुणाला रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे तरुण लातूर शहरातून आपल्या गावाकडे दुचाकीवरून परतत होते. रात्रीच्या वेळी वाहतुकीचा वेग जास्त असल्यामुळे रस्त्यावर अपघातांचा धोका वाढतो. त्याच सुमारास करजगाव पाटीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की दुचाकीचे अक्षरशः चुराडा झाला.

अपघात झाल्यानंतर तातडीने स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तिन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दोन जण जागीच मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर तिसऱ्या तरुणाने थोड्याच वेळात दम तोडला. या घटनेने संपूर्ण निलंगा तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघात घडताच कार चालकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावरुन पळ काढला.

या दुर्घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात एकच शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघात घडवून आणणाऱ्या कारचालकाबद्दल पोलीस तपास सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे घडला याची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. लातूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT