Maharashtra political updates on Shrikant Shinde and Uddhav Thackeray SAAM TV
महाराष्ट्र

शिवसेना शाखेत एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंचा फोटो; बघून श्रीकांत शिंदेंचा संताप अनावर, पदाधिकाऱ्यांना झापलं

Latest political news : ठाण्यातील कोपरी येथील शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदे यांच्या फोटोशेजारी उद्धव ठाकरे यांचा फोटो लावलेला पाहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकाराबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांना जाब विचारत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Saam TV News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव असलेल्या कोपरीतच पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका बाजूला महाराष्ट्रभर पक्षविस्तारासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे कोपरीच्या होमपिचवरच शिवसेनेची संघटनात्मक पकड किती सैल झाली आहे, याचा प्रत्यय खासदार श्रीकांत शिंदे यांना आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चेंदणी कोळीवाड्यातील एका कार्यक्रमानिमित्त कोपरीच्या शिवसेना शाखेत गेलेल्या खासदार शिंदे यांना शाखेतील उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहून संताप अनावर झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रसंगानंतर खासदार नरेश म्हस्के यांनाही या नाराजीचे चटके बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोपरीतील शिवसेनेमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी रात्री खासदार श्रीकांत शिंदे चेंदणी कोळीवाड्यात एका क्रीडा कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना गराडा घालत आग्रहाने कोपरीतील शिवसेना शाखेत नेले. मात्र, शाखेत प्रवेश करताच तेथील भिंतीवर एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राशेजारी उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र पाहून खासदार शिंदे नाराज झाल्याचे समजते. त्यानंतर शाखेतील पदाधिकारी आणि उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी जाब विचारल्याची चर्चा आहे.

या प्रसंगामुळे शाखेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. खासदार शिंदे यांनी तेथून तडक बाहेर पडल्याचेही सांगितले जाते. यावेळी उपस्थित असलेले खासदार नरेश म्हस्के यांनाही या नाराजीचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात शाखा आणि स्थानिक संघटनांवर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरू झाला. ठाण्यातील कोपरीदेखील त्याला अपवाद राहिले नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून या शाखेवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याची पार्श्वभूमी आहे. मात्र, अपेक्षित राजकीय ताकद उभी करता न आल्याने शिंदे गटाला या शाखेत उद्धव ठाकरे गटासोबतच सहअस्तित्वाची तडजोड करावी लागल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जाते. परिणामी, एकाच शाखेत दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते आपापली उपस्थिती दाखवत असल्याचे चित्र निर्माण झाले.

शाखेच्या भिंतीवर एका बाजूला उद्धव ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असल्याची परिस्थिती आहे. हीच बाब खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची नाराजी उफाळून आल्याची चर्चा आहे.

मात्र, हा केवळ एका फोटोचा विषय नसून गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या स्थानिक राजकीय संघर्षाचे ते प्रतीक असल्याचे मानले जात आहे. या अंतर्गत धुसफुशीमागे केवळ शाखेचा वाद नसून कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानाचाही प्रश्न असल्याचे बोलले जाते.पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत त्यामागे असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसाफिरखान्याच्या तोडक कारवाईला स्थगिती कायम! उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना खडे बोल

Starting and stopping bike: बाइक सुरू केल्यानंतर लगेच बंद केली तर इंजिनवर काय परिणाम होतो?

Phulwara Movie: नऊवारी साडी, ठसकेबाज अदाकारी अन् लावणीचा साज; 'फुलवरा'मध्ये वैदेही-प्रियदर्शिनींचा मराठमोळा अंदाज

राज्यात ४२ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील ३ महिने मोफत धान्य; सरकारचा मोठा निर्णय

Marathwada Yatra: पंढरपूरनंतरची दुसरी मोठी यात्रा, पैठणनगरीत फुलतो भक्तीचा मळा

SCROLL FOR NEXT