Shivendra Raje Bhosale
Shivendra Raje Bhosale ओंकार कदम
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिंदेच्या मंत्रिमंडळात शिवेंद्रराजे भोसलेंना मंत्रिपद मिळणार?

ओंकार कदम

सातारा - पश्चिम महाराष्ट्र हा पहिल्या पासून राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो राष्ट्रवादीनेते शरद पवार (Sharad Pawar) यांना या जिल्ह्याने भरभरून दिले आहे. परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकी आधी आ.शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale) यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने या किल्ल्याचे बुरुज ढासळण्यास सुरवात झाली त्यांच्या पाठोपाठ खा.उदयनराजेंनी सुधा राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप मध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्याची समीकरणेच बदलली.

आ.जयकुमार गोरे यांनी सुद्धा काँग्रेसला हात दाखवत भाजप मध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले. सातारा शहरात शरद पवार यांची पावसातील सभा झाली आणि राज्यातील समीकरणे बदलली. त्या सातारा मतदार संघात मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शिवेंद्रराजे यांनी दारुण पराभव केला. तेव्हा पासूनच शिवेंद्रराजे यांचे राजकीय वजन वाढलेले पाहायला मिळाले.

हे देखील पाहा -

शिवाय छत्रपतींच्या घरण्याविषयी कायम राष्ट्रवादी मध्ये आकस असल्याचे आरोप भाजपने वेळोवेळी शरद पवार यांच्यावर केले होते.आता त्याच भाजपला शिवेंद्रराजेंना मंत्रिमंडळात घेऊन छत्रपतींच्या गादीवर असलेले प्रेम दाखवण्याची संधी चालून आली आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या उमेदवारीवरून भाजपवर मराठा समाज आणि छत्रपतींच्या गादीवर प्रेम करणारे कार्यकर्ते नाराज आहेत.

ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. शिवाय शिवेंद्रराजेंचा राजकीय प्रवास पाहता सलग चार वेळा शिवेंद्रराजे हे जावळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर तर मागील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर त्यांनी विजय संपादन केला आहे.

ग्रामपंचायत पासून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत सर्व ठिकाणी शिवेंद्रराजांची मोठ्या प्रमाणात सत्ता असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सोसायटी यामध्ये सुद्धा शिवेंद्रराजे गटाचा मोठा प्रभाव असल्याचे पाहायला मिळत. त्याचबरोबर सातारा जावळी मतदारसंघ सोबतच कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ या तीन मतदारसंघांमध्ये शिवेंद्र राजांचे मोठे प्राबल्य आहे.

त्यामुळे भाजपला सातारा जिल्ह्यामध्ये सत्ता स्थाने मजबूत करायचे असतील तर आमदार शिवेंद्रराजन शिवाय पुढे जाता येणार नाही शिवेंद्रराजेंना मंत्रीपद देऊन त्यांची ताकद वाढवली तर पर्यायाने पक्षाला सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठी ताकद मिळणार आहे.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अभयसिंहराजे भोसले यांनी सुरू केलेले काम आमदार शिवेंद्रराजे यांनी सहजपणे आता पुढे नेलेले आहे. या कारखान्याच्या माध्यमातून जवळजवळ तीन विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या शेतकऱ्यांना उसाचे बिल हे वेळेवर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये शिवेंद्रराजेंविषयी आदराचे स्थान आहे. शांत संयमी आणि पक्षाच्या चौकटीत काम करणारे आमदार म्हणून शिवेंद्रराजे यांची ख्याती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंना मंत्री मंडळात स्थान देण्याचा शब्द देखील सातारकरांना दिल्याने आता भाजप छत्रपतींना दिलेला शब्द पाळून मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT