Gadchiroli Accident News Saam TV
महाराष्ट्र

Gadchiroli Accident News: पाण्याने केला घात; एकाच गावातील ४ तरुणांचा गुदमरून मत्यू

4 youth drowned in water: उन्हाच्या उकाड्यापासून सुटका म्हणून पोहायला गेले; पाण्याचा अंदाज न आल्याने

Ruchika Jadhav

Gadchiroli News: तरुण मुलं नेहमीच काहीतरी अतरंगी आणि भन्नाट करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या हलगरजीपणाने अनेक तरुणांचे जीव गेले आहेत. डोंगर माथ्यावर अथवा पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी करणाच्या नादात अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात गडचिरोली एथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसर, गडचिरोलीच्या (Gadchiroli) चामोर्शी तालुक्यात ही घटना घडली आहे. येथील चिंचडोह या धरणात (Dam) पोहण्यासाठी चार तरुण गेले होते. उन्हाच्या उकाड्यामुळे काही वेळ पोहून ते पुन्हा घरी परतनार होते. अशात हे पाणी आपला जीव घेईल याची या तरुणांना काहीच कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे ते चौघेही पाण्यात उतरले. पाण्यात उतरल्यावर अचानक पाणी वाढले.

आतमध्ये जाताना पाणी किती खोल आहे याचा अंदाज या तरुणांना आला नाही. त्यामुळे पाण्यात बुडून या चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहित शर्मा, प्रफुल यदुरे, शुभम लांजेवार, महेश डोंगरे अशी या चारही मृत तरुणांची नावे आहेत.

पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेतली. त्यानंतर शोधमोहीम करत पोलिसांनी या चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्याने गावात मोठी शोककळा पसरली आहे.

लिफ्टमध्ये अडकल्याने 13 वर्षीय चिमुकल्याचा गळा कापून मृत्यू

खेळता खेळता लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक दरवाजा बंद होऊन 13 वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या गेटमध्ये अडकून मृत्यू झालाय. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना इतकी भीषण होती की गेटमध्ये मुलाचा अर्धाअधिक गळा कापला गेला.

साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त त्याचे आई-वडील नुकतेच हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकीबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवले होते. सदर घटनेनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT