Lata Mangeshkar : लता दीदींचे लातूरशी होते अनोखे नाते; पहा जुन्या आठवणींचे Photos  SaamTvNews
महाराष्ट्र

Lata Mangeshkar : लता दीदींचे लातूरशी होते अनोखे नाते; पहा जुन्या आठवणींचे Photos

दीपक क्षीरसागर

लातूर : 1970 च्या काळात गान सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायनाचे विशेष चॅरिटी शो घेऊन लातुर (Latur) जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यातील औराद शहाजनी इथं महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात महाविद्यालय उभारलं आज या महाविद्यालयात दीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. यावेळी अनेक जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाने तेरणा तीरावरील लतादीदींचे स्वर हरवले आहेत अशा प्रकारच्या भावना औरादकर व्यक्त करत आहेत. (Lata Mangshkar Latest News & Photos)

Aurad Shajani

मंगेशकर परिवारांनी औराद येथील ग्रामीण भागात एक शिक्षणासाठी केलेलीं मोलाची मदत औरादकरांच्या कायम स्मरणात आहे. लतादीदी या औरादकरा सोबत स्वरा बरोबर शिक्षणाने ही जोडल्या गेल्या होत्या. औराद शहाजनी येथील महाविद्यालयाला लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मास्टर दीनानाथ मंगेशकर असे नाव देण्यात आलेले आहे.

औराद शहाजनी (Aurad Shajani) येथे महाविद्यालयांच्या इमारतीच्य उद्घानप्रसंगी कार्यक्रमासाठी 4 डिसेंबर 1976 रोजी लता मंगेशकर औराद ला आलेल्या होत्या. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी औराद येथील शारदोपासक शिक्षण संस्थेस त्यांनी लता मंगेशकर संगीत रजनीचा कार्यक्रम देण्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे 28 फेब्रुवारी 1981 रोजी लतादीदींचा औराद शहाजनी येथे लता मंगेशकर संगीत रजनी हा कार्यक्रम झालेला होता. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेली गाणी आजही तेरणा तीरावर गुणगुणत आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेले मोगरा फुलला हे गीत आजही स्मरणात आहे. औराद शहाजनी तील शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली मदत ही मोलाची मदत केली आहे. अशा प्रकारची भावना संस्थाध्यक्ष विश्वनाथराव वलाडे गुरुजी यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने; होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT