Ahmednagar Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; 'या' ठिकाणी असणार नो व्हेइकल झोन

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

New Year Celebrations in Shirdi:

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत प्रत्येक वर्षी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. साईमंदिर परीसरातील महामार्ग आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर आजपासून नो व्हेइकल झोन लागू केला गेला आहे. 2 जानेवारीपर्यंत शिर्डीत साईमंदिर परीसरात वाहनांना प्रवेश करता येणार नाहीए. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साईमंदिरा समोर असलेल्या नगर मनमाड महामार्गावर वाहने घेऊन जाता येणार नसून लक्ष्मीनगर ते नविन पिंपळवाडी रोड परीसरात हा नो व्हेइकल झोन जाहीर करण्यात आला आहे.

31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी, 20 अधिकारी आणि 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांचे पथक तयार करण्यात आलेय.

यासह वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून 2 जानेवारीपर्यंत मंदिरासमोरील महामार्ग, जुना पिंपळवाडी रोड, चावडी ते गेट क्रमांक चार आदी ठिकाणी नो व्हेईकल झोन लागू करण्यात आलाय. भाविकांच्या आणि मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतात आदल्या वर्षी आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी पापे सर्वकही दूर करून व्यक्ती पुढे जातात. यावेळी अनेक भाविक साईंच्या दर्शणासाठी येतात. आशिर्वाद घेऊन नवीन वर्षात केलेले संकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT