ratnagiri rain update, chiplun, kumbharli ghat, karad, IMD. saam tv
महाराष्ट्र

कुंभार्ली घाटात दरड कोसळली; चिपळूणला एनडीआरएफ दाखल, अफवांवर विश्वास ठेऊ नका

राज्यातील बुहतांश जिल्ह्यात विशेषत: काेकणात गेले दाेन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.

अमोल कलये

रत्नागिरी - रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा (Rain) फटका कुंभार्ली घाटाला देखील बसला आहे. सतत पडणा-या पावसामुळे कुंभार्ली घाटात (Khumbarli Ghat) दरड कोसळली आहे. चिपळूण - कराड मार्गावरील (Chiplun Karad Road) कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. या घाटात ज्या ठिकाणी दरड (landslide) काेसळली आहे तेथे जेसीबीच्या सहायाने दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तसेच पुढील तीन दिवस रत्नागिरी आणि रायगडसाठी हा रेड अलर्ट (अतिवृष्टीचा इशारा) आहे. (kumbharli ghat latest marathi news)

चिपळूणला एनडीआरएफ पथकाची पाहणी 

रत्नागिरीत सध्या जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक कालपासूनच दाखल झाले आहे. गेल्यावर्षी चिपळूणमधील पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी आधीच एनडीआरएफची एक टिम दाखल झाली. गेल्यावर्षी एनडीआरएफ टीम दाखल होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे टिम चिपळूणमध्ये उशीरा दाखल झाली होती मात्र यावर्षी ही खबरदारी प्रशासनानं आधीच घेतली.

पाऊस संपेपर्यंत ही टिम चिपळूणमध्येच असणार आहे. आज या टिमने अनेक ठिकाणची पाहणी केली. ज्या भागात पुर येऊ शकतो, ज्या भागात दरड कोसळू शकते अशा भागात जाऊन पाहणी केली गेली.

दरम्यान धरणाचे पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. नगरपालीकेने आपत्कालीन कक्ष सुरु केलाय. त्या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन प्रसाद शिंगटे (मुख्याधिकारी) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT