Ambenali Ghat Landslide 
महाराष्ट्र

Ambenali Ghat Landslide : सावधान! आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; नवी मुंबईतही मोठी दुर्घटना

Ambenali Ghat Landslide News : पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरून प्रवास करत असाल तर, सावधान! आंबेनळी घाटात काल (मंगळवार) रात्रीपासून दरडी कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.

Nandkumar Joshi

सचिन कदम/ सिद्धेश म्हात्रे

Ambenali Ghat Landslide News : पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरून प्रवास करत असाल तर, सावधान! आंबेनळी घाटात काल (मंगळवार) रात्रीपासून दरडी कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता आणि त्यानंतर बुधवारी सकाळी ७ वाजता दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत होत नाही तोच दुपारच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही तासांपासून मुंबई, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड आणि उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. तर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आता आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याच्या (Landslide) घटना घडत आहेत.

प्रवास करताना काळजी घ्या!

आंबेनळी घाटात काही वेळापूर्वीच दरड कोसळली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित यंत्रणांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली. पण त्यानंतर पुन्हा एक किलोमीटरवर दरड कोसळली आहे.

डोंगरावरील मातीचा ढिगारा थेट रस्त्यालगत आला आहे. वाहतूक बंद झाली नसली तरी, दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता वाहनधारकांनी प्रवास करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सीवूड्समध्ये आलीशान कारवर भिंत कोसळली, मोठं नुकसान

नवी मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. एनआरआय कॉम्प्लेक्स सीवूड इस्टेट इमारत क्रमांक ५७ च्या भिंतीचा भाग पार्क केलेल्या आलीशान कारवर कोसळला. या दुर्घटनेत तीन कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT