Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: साताऱ्यात सैनिकाच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये लंपास

बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अज्ञात व्यक्तीचा शोध घेताहेत.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यात (satara) सुटीसाठी गावी आलेल्या सैनिकाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गायब केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अनोळखी व्यक्तीने बँक (bank) खात्यातील साडेसात लाख रुपये काढल्याप्रकरणी बोरगाव पोलिस (police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (satara latest marathi news)

आसनगाव (ता. सातारा) येथील प्रमोद शंकर पवार हे गेल्या तीन वर्षांपासून भारतीय सैन्य दलात (indian army) कार्यरत आहेत. सध्या ते अरुणाचल प्रदेश (arunachal pradesh) येथे कर्तव्य बजावत आहेत. गावी घर बांधण्यासाठी प्रमोद यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रतापगंज पेठ शाखेतून अकरा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी त्यांच्या खात्यात साडेसात लाख रुपये शिल्लक होते.

गुरुवारी सकाळी ते घरी असताना क्रेडिट कार्डसाठी (credit card) 28 हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला चौकशीसाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरला फोन केला असता त्यांना एक application डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. ते डाऊनलोड केल्यानंतर बँकेचा खाते क्रमांक विचारण्यात आला तो सांगितल्यावर पाच मिनिटातच त्यांच्या मोबाईलवर पैसे कट झाल्याचे मेसेज पडू लागले. अनोळखी व्यक्तीने त्यांच्या खात्यातून काही मिनिटातच टप्प्याटप्प्याने साडेसात लाख रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा सायबर सेलकडे (Satara Cyber ​​Cell) तक्रार केली.

पोलिसांनी याबाबत तपास केला असता ही सर्व रक्कम कर्नाटका बँकेच्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले. कर्नाटका बँकेशी संपर्क साधला असता त्यावेळी खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे वर्ग झाल्याचे समजले. बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

Shivbhojan Thali: उद्धव ठाकरेंची 'शिवभोजन थाळी' योजना बंद पडणार? गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे केंद्र बंद करण्याचे आदेश|VIDEO

Rajgad To Pratapgad: राजगड ते प्रतापगड प्रवास कसा कराल? बस, रेल्वे आणि खासगी वाहन मार्ग

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT