२८ वर्षीय महिला पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या! संशयास्पद प्रकरण? SaamTvnews
महाराष्ट्र

२८ वर्षीय महिला पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या! संशयास्पद प्रकरण?

ज्योती यशवंत बघेले (वय 28) असे मृत महिला पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

अभिजित घोरमारे

गोंदिया : गोंदिया (gondia) मधील सालेकसा (salekasa) पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस (police) कर्मचार्‍याने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा येथे घडली आहे. ज्योती यशवंत बघेले (वय 28) असे मृत महिला पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून हे आत्महत्या प्रकरण संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा :

ज्योती बघेले या सालेकसा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पदावर कार्यरत होत्या. त्यांचे 2017 मध्ये पांढरी पाउलदौना येथील रमेश गिरिया यांच्याशी लग्न झाले होते. मृत महिला पोलीस शिपायाचे पती रमेश गिरिया हे देखील सालेकसा पोलीस ठाण्यात सी-60 पथकामध्ये कार्यरत आहेत. हे दांपत्य आपल्या अडीच वर्षाच्या मुलासह सालेकसा येथे भाड्याच्या घरात राहत आहे.

आज नेहमीप्रमाणे दोन्ही पती-पत्नी आपापल्या कार्यस्थळी कर्तव्यावर गेले होते. ज्योती सालेकसा पोलीस ठाण्यात कामावर असताना, अचानकपणे त्या आपल्या घरी निघून गेल्या. बऱ्याच वेळापासून त्या पोलीस ठाण्यात आल्या नाही. नंतर समजले कि त्यांनी आपल्या खोलीत गळफास घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी पोहचत ज्योती यांना फासावरून खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे उपचारासाठी दाखल केले.

परंतू, स्थिती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले असून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, सदर प्रकरण संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे असून सालेकसा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT