Ladki Bahin yojna get 2100 Eknath Shinde gave an explanation  Saam Tv News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी? DCM एकनाथ शिंदेंकडून मोठी माहिती

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रूपये देवू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Prashant Patil

मुंबई : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करयला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे.

या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आलं आहे. मात्र ही योजना सुरूच राहणार असून, पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हफ्त्यामध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना २१०० रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, आता २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रूपये देवू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर २१०० रुपये देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT