Chandrapur Crime : शेतातील विहिरीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह, मृत्यूचं गूढ वाढलं; कुटुंबीयांना वेगळाच संशय

Chandrapur Minor Girl Dead Body Found in Farm Well : पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला भेट दिली. घटनेमुळे पोलीस स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण.
minor girl found in Farm Well in Chandrapur Chora village
minor girl found in Farm Well in Chandrapur Chora villageSaam Tv News
Published On

चंद्रपूर : शेत शिवारातील विहिरीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चोरा या गावातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती इथे आणला. मात्र, मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आलं आहे.

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेमुळे काही काळ पोलीस स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेची सत्यता समोर येईल. या घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस निरीक्षक लता वाढिवे करीत आहेत.

minor girl found in Farm Well in Chandrapur Chora village
Pune Crime : तोंडाला माती, पाय जमिनीला टेकलेले; पडक्या घरात ठाकरेंच्या शाखाप्रमुखांच्या मुलाचा मृतदेह; वडील म्हणाले...

विहिरीत उडी घेऊन विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

दरम्यान, काल अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वरुड येथील एका विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. अंकिता शेंडे (रा. लिंगा) असं विद्यार्थिनीचं नाव आहे. ती महात्मा फुले विद्यालय येथे शिक्षण घेत होती. हांडेवाडीतील वस्तीगृहात ती राहत होती. पटेल ले-आउटमधील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केलीय.

आत्महत्येची घटना सायंकाळी ५ वाजता उघडकीस आल्यानंतर तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या संदर्भातील उत्तरीय तपासणी सध्या वरुड पोलीस करत आहेत.

minor girl found in Farm Well in Chandrapur Chora village
Disha Salian Case : दिशा सालियानच्या शरीरावर जखमा नव्हत्या, मग तिचा मृत्यू कसा झाला? शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com