Pune Crime : तोंडाला माती, पाय जमिनीला टेकलेले; पडक्या घरात ठाकरेंच्या शाखाप्रमुखांच्या मुलाचा मृतदेह; वडील म्हणाले...

Pune Crime News : साहिल विलास कांबळे (वय १८) असं मृत तरुणाचं नाव असून, तो शनिवार पेठमध्ये प्रिटींग प्रेसमध्ये कामाला होता. त्याचे वडील विलास कांबळे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विश्रांतवाडी शाखाप्रमुख आहेत.
Yerawada Thackeray group branch chief Vilas Kamble son body found
Yerawada Thackeray group branch chief Vilas Kamble son body found Saam Tv News
Published On

पुणे : राज्यात गु्न्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार, अपहरण अशा प्रकारच्या घटना सतत घडताना दिसत आहे. याचं प्रमाण पुण्यात जास्त प्रचंड प्रमाणात दिसत आहे. याचदरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा जुन्या वसाहतमधील एका पडक्या घरात १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या तरुणाची हत्या केली असून पोलिसांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केलीय.

साहिल विलास कांबळे (वय १८) असं मृत तरुणाचं नाव असून, तो शनिवार पेठमध्ये प्रिटींग प्रेसमध्ये कामाला होता. त्याचे वडील विलास कांबळे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विश्रांतवाडी शाखाप्रमुख आहेत. १६ मार्चला दुपारी साहिलला धमकीचे फोन आले असल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौकीत दिली. मात्र, पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं आहे. यानंतर त्याचं अपहरण झालं तेव्हाही तक्रार दिली तरी पोलिसांनी कोणती भूमिका घेतली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला.

Yerawada Thackeray group branch chief Vilas Kamble son body found
शेतकरी माय-बापाच्या १४ वर्षीय लेकराचं अपहरण, अखेर ९ दिवसांनी लागला तपास, पण...; आई-वडिलांचा आक्रोश

विलास कांबळे म्हणाले की, धमक्यांचे फोन येत असल्याचे पोलिसांना सांगूनही कोणताच तपास केला नाही. धानोरी, विश्रांतवाडी-येरवडा परिसरात मोठी गुन्हेगार टोळ्या सक्रीय आहेत. याच्यावर पोलिसांनी कारवाई करून गुन्हेगारांना पकडून त्यांना इंगा दाखवला पाहिजे. तरूण पिढी व्यसनी होत चालली आहे. सर्वत्र अंमली पदार्थ आणि गांजाची विक्री होत आहे. हे पोलिसांना माहिती असून कोणतीही कारवाई केली जात नाही. ही खंत आहे. मात्र हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केलीय.

Yerawada Thackeray group branch chief Vilas Kamble son body found
Pune Fire News : कटकारस्थान अन् चार निष्पापांचा बळी, ज्यांच्यावर राग होता ते वाचले, अन्...; हिंजवडी बस प्रकरणाचा धक्कादायक उलगडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com