Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार? भाजप नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, हे पैसे कधीपासून देण्यात येणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात होते. मात्र, आता ही रक्कम वाढवली जाणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरुन वाढवून २१०० करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. विधानसभा निवडणुका झाल्या आहेत तर आता २१०० रुपये कधीपासून देणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठ यश मिळालं आहे. निवडणुकीत जिंकून आल्यानंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये दिले असणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी ७ ते १० महिने लागण्याची शक्यता आहे.याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी द इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना कधीपासून २१०० रुपये मिळणार याबाबत माहिती दिली आहे. (Ladki bahin Yojana Update)

२१०० रुपये कधीपासून देणार? (When Will 2100 Ruppes Come)

सुधीर मुनगंटीवर यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की, लाडकी बहीण योजनेत खरंच महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत का?यावर त्यांनी सांगितलं की, आम्ही १०० टक्के आमचे आश्वासन पूर्ण करणार आहे. जर आम्ही असं केलं नाही तर आमची प्रतिमा वाईट होईल. त्यामुळे आम्ही नक्कीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवं, असं सांगणार आहे. आमच्या सरकारमध्ये २१०० रुपये देण्याची ताकद आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

वाढीव रक्कम भाऊबीजेपासून

लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव रक्कम कधीपासून देणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मागच्या वर्षी भाऊबीजेला योजना लागू केली होती. त्यामुळे या वर्षी भाऊबीजेपर्यंत ही रक्कम वाढवली जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT