Ladki Bahin Yojana ai image
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: खोटी माहिती देऊन ₹१५०० घेणारी लाडकी बहीण होणार परकी, 'ओवाळणी'चे सगळे पैसे परत घेणार!

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत आता खोटी माहिती भरलेल्या लाभार्थी महिलांकडून पैस परत घेतले जाणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. लाडकी बहीण योजनेतील जवळपास ४५०० महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानंतर खोटी माहिती भरुन पैसे घेतलेल्या महिलांवर काही कारवाई होणार का, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतला असेल तर काय होणार, पैसे परत घेणार का असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले होते. दरम्यान, आता आदिती तटकरेंनीच याबाबत माहिती दिली आहे.खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अपात्र महिलांकडून पैसे परत घेऊन सरकारी तिजोरीत जमा केले जातील, असंही त्यांनी सांगितले. हे पैसे लोककल्याणकारी कामांसाठी आणि योजनांसाठी वापरले जातील. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत साडेचार महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत.तर अशा अनेक अपात्र महिलांनी पुढे येऊन आपले अर्ज माघारी घ्यावेत, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे. ज्या महिलांनी पात्र नसतानाही अर्ज भरला त्यांची पडताळणी स्वतंत्रपणे केली जाणार आहे.

राज्याबाहेर लग्न करुन गेलेल्या महिला किंवा इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. पाच महिन्यात ज्या महिलांना सरकारी नोकरी लागलेल्या महिलांची यादीही समोर आली आहे. त्यामुळे अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT