Ankush Dhavre
राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.
या योजनेसाठी फॉर्म भरलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे.
तर अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मात्र असं काहीच होणार नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत अपात्र असलेल्या महिलांकडून कुठलीही दंडात्मक रक्कम वसूल केली जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
मात्र निकषात बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते देण्यात आले आहेत.
लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे.