Ladki Bahin Yojana update  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता रखडला आहे. हा हप्ता कधी मिळणार, याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे. या योजनेविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट

जानेवारीच्या हप्त्याबाबत महतवाची माहिती समोर

सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. निवडणुकीमुळे बँक खात्यात पैसे येण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. आता जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकींची तयारी सुरू झाली आहे. या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानाआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता केला जाऊ शकतो. याआधी महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीआधी पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

तत्पूर्वी, काही महिलांचे योजनेचे लाभ अलीकडे बंद करण्यात आलेत. काही महिलांनी ई-केवायसी करताना प्रश्न नीट न समजल्याने चुकीची माहिती भरली होती. त्यानंतर प्रशासनाने या महिलांना अपात्र ठरवलं होतं. मात्र, आता अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. या माध्यमातून त्यांना चूक सुधारण्याची एक संधी मिळणार आहे. त्यानंतर काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकला

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा|VIDEO

Republic Day 2026 Wishes: WhatsApp वर शेअर करा देशभक्तीने भरलेले मराठी, हिंदी आणि English संदेश एका क्लिकवर

Padma Awards 2026: 'या' कलाकारांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान, यादी जाहीर

Raigad Politics: महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरण; गोगावलेंना उच्च न्यायालयाचा दिलासा,विकास गोगावलेंसह ८ आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT