Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींवर कारवाई होणार, तुमचंही नाव आहे का? वाचा सविस्तर

Chandrashekhar Bawankule On Ladki Bahin Yojana: सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. आता त्या महिलांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवीन अपडेट समोर येत असतात.नुकतीच काही सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. जवळपास अडीच हजार महिला सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. त्यांनी निकषाबाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याकडून वसुली करायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? (Chandrashekhar Bawankule On Ladki Bahin Yojana)

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी असं करायला नको होते. दीड हजार रुपये महिन्याकरिता सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी, बहिणींनी असे करायला नको. मिळालेला लाभ परत करायला पाहिजे. शासन वसुली करेलच. काही खात्यांनी चौकशी सुरू केली आहे. काही खात्यांनी वसुली सुरू केली आहे. मात्र कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे सक्षम आहेत त्यांनी घेऊ नये, घेतला असेल तर त्यावर कारवाई नक्की होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या नियमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असं लिहलं आहे. तरीही त्यांनी अर्ज केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांचे अर्ज स्विकारले गेले. या अर्जांची एकदा पडताळणीदेखील झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा पुन्हा पडताळणी झाली तेव्हा या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इतर अजूनही अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला असल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shoking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT