Ladki Bahin Yojana: लाडकीनं केली लाडकीची फसवणूक; बोगस लाडकींकडून वसुली होणार?

Ladki Bahin Yojana Government Scheme : हजारोंचा सरकारी पगार तरी दीड हजारांची हाव काही सुटली नाही. होय, राज्यात सरकारी नोकरदार लाडक्यांची लबाडी समोर आलीय.नेमक्या किती सरकारी लाडक्यांनी तिजोरीवर डल्ला मारलाय? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची छाननी सुरु झाली. या एकेका चाळणीत तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहीणी वगळण्यात आल्या. मात्र हे कमी होतं की काय, आता तर चक्कं सरकारी नोकरदार लाडक्या बहीणींनीच खऱ्या लाडक्या बहीणींच्या निधीवर डल्ला मारल्याचं समोर आलंय. राज्यात तब्बल 2 हजार 652 सरकारी नोकरदार लाडक्या बहीणींनी तिजोरीची लूट केल्याचं उघड झालंय.

त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. तर लाडकीवर नाही तर अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केलीय. तर सत्ताधाऱ्यांनी मात्र बोगस लाडकीवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

Ladki Bahin Yojana
Vande Bharat Sleeper Train: मुंबई- दिल्लीचा प्रवास होणार सुसाट; देशात १० स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार, जाणून घ्या Routes अन् सोयी सुविधा

सरकारी नोकरी असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार असा नियम आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसवून सरकारी नोकरदार लाडक्यांनी सरकारी तिजोरीतील 3 कोटी 58 लाख रुपये लाटले. मात्र हा हेराफेरीचा प्रकार कसा उघड झाला? पाहूयात.

1 लाख 60 हजार सरकारी कर्मचाऱ्यांच्या युआयडीची तपासणी

तपासणीतून 2 हजार 652 बोगस लाडक्यांची पोलखोल

वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

8 लाख 85 हजार महिलांकडून 2 योजनांचा लाभ

आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी होणार

Ladki Bahin Yojana
Viral News: बँकेनं भुतांना दिलं लाखोंचं कर्ज? सरकारी बँकेलाच भुतांनी गंडवलं?

हजारोंचा सरकारी पगार असतानाही या सरकारी लाडक्यांना दीड हजाराची हाव सुटली नाही.. त्यामुळे दीड हजारांसाठी हापापलेल्या सरकारी लाडक्यांकडून सरकार वसुली करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.. मात्र ज्यांनी या कागदपत्रांची डोळे झाकून पडताळणी केली, त्यांच्यावरच्या कारवाईचं काय? हाच सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com