Ladki Bahin Yojana SaamTv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: १२००० की १८०००, 'कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे लाडक्या बहिणींनी ठरवावे', कृषीमंत्र्यांचं विधान

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. म्हणजेच वर्षाला १८००० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. वर्षाला एकूण १८००० रुपये महिलांना मिळणार आहे. मात्र, या योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत. याबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे. (Ladki Bahin Yojana)

नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण १२००० रुपये दिले जातात. तर अनेक शेतकरी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. कोणत्याही एकाच योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे.

माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय की,नमो सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. तसेच लाडकी बहीण योजनेतही महिलांना लाभ मिळतो. या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवायचे आहे. लाडकी बहीण योजना की पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांच्या हातात आहे. (Ladki Bahin Yojana Or PM Kisan Yojana)

नियमाप्रमाणे महिलांना दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात. प्रधानमंत्री किसान योजना किंवा लाडकी बहीण योजना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचाय हे महिलांनी ठरवायचे आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याने महिला शेती कामासाठी येत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावरदेखील माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कामासाठी लाडक्या बहिणी कशाला हव्या. त्यांच्यावर का अवलंबून राहायचं, असं त्यांनी म्हटलं आहे.

नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येकी ६-६ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे या योजनेमध्ये १२००० रुपये मिळतात. तर लाडकी बहीण योजनेत वर्षाला १८००० रुपये मिळतात. त्यामुळे महिलांनी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT