ladki bahin yojana  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार? तुमचं नाव यादीत आहे का? वाचा सविस्तर, VIDEO

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरु असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय. 50 लाख लाडक्य़ा बहीणी लवकरच अपात्र ठरणार आहे. अपात्र लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

राज्य सरकारची गेंमचेंजर ठरलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. एकीकडे लाभार्थ्यांना मे महिन्यात दहावा हफ्ता मिळत असताना दुसरीकडे सरकारनं लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरु केलीय. त्यामुळे अपात्रतेची अनेक प्रकरणे समोर येतायत. या पार्श्वभूमिवर अर्थमंत्र्याचं मोठं विधान समोर आलंय. निवडणुकीत वेळ कमी असल्यानं अर्जांच्या तपासणीसाठी वेळ मिळाला नाही, अशी कबुली अर्थमंत्री अजित पवारांनी दिलीय.

सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं होतं. इन्कम टॅक्सकडील माहितीवरून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या 50 लाखांहून अधिक असू शकते. त्यामुले हे सर्व बोगस लाभार्थी अपात्र ठरणार आहेत. याआधी कोणत्या कारणांमुळे लाडकींना अपात्र ठरवण्यात आले होते. पाहूयात...

50 लाख लाडक्या अपात्र?

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र

वय 65 वर्षांहून अधिक असल्याने 1.10 लाख महिला अपात्र

चारचाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्याने 7.70 लाख महिला अपात्र

सरकारी सेवेत कार्यरत असल्याने 2,652 महिला अपात्र

आत्तापर्यंत 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलयं. त्यामुळे सरकारी योजनेची वाताहात पाहता विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलयं.

योजनेच्या घोषणेनंतर सुमारे दोन कोटी 65 लाख लाभार्थी महिलांनी लाडकीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. या योजनेच्या सर्व अटी व शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण एक कोटी 20 लाख महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषानुसार छाननी का केली नाही? मतांसाठी घाईघाईने योजना लागू केली का ? असा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Neck Darkness Removal: टॅनिंगमुळे मान काळवंडली? करून पाहा 'हा' उपाय; त्वचेला काळेपणा होईल कमी

Pancakes Recipe: रविवारी नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT