Ladki Bahin Yojana Saam Tv News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: सोलापुरातील ४३० भावांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, महिनाभरात इतक्या लाखांची वसूली होणार

Solapur 430 Men Get Benefit of Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत आता पुरुषांनी लाभ घेतला आहे. सोलापूरातील तब्बल ४३० पुरुषांनी लाभ घेतला आहे. आता या पुरुषांवर कारवाई होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिलांना निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. महिलांसोबतच अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. जवळपास साडे चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. सोलापूरातील ४३० पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे.

सोलापूरातील ४३० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ (Solapur 430 Men Get Benefit of Ladki Bahin Yojana)

सोलापूरात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी झाली. यामध्ये ४३० पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ११ महिन्यांपासून हे पुरुष योजनेचा लाभ घेत होते. या योजनेतून त्यांनी जवळपास २३.१० कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे.

आता ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून वसूली केली जाणार आहे. या पुरुषांना २३.१० कोटी रुपये जमा करायचे आहे. दरम्यान, ही रक्कम जमा करण्यासाठी महिन्याभराची मूदत देण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बोगस भावांवर कारवाई

लाडकी बहीण योजनेत फक्त महिलांना लाभ मिळतो. परंतु या योजनेत हजारो भावांनी योजनेचा लाभ घेतला आहे. आता या भावांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे.

२६ लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेत २६ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. आता या २६ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यांच्याकडून परत पैसे घेतले जाणार की नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे - सुनील तटकरे

Ganesh Festival: गणेशोत्सव मंडळात महिला नाचवल्या, गणेशमूर्तीसमोर अश्लील डान्स ; बघा संतापजनक VIDEO

PSI Departmental Exam: सरकारचा मोठा निर्णय; PSI पदासाठी होणार विभागीय परीक्षा; मिळणार 25 टक्के आरक्षण

Maharashtra Politics: महायुतीत धुसफूस; शिंदे गटाशी जवळीक भोवली! नगरअध्यक्षासह भाजपचे सहा नगरसेवक निलंबित|VIDEO

Shirpur News : अवैध सावकारी फोफावली; एकाच वेळी पाच ठिकाणी पोलिसांची छापेमारी

SCROLL FOR NEXT