Ladki Bahin Yojana update  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

Ladki Bahin Yojana ekyc : लाडक्या बहिणांना महायुती सरकारने मोठा दिलासा दिलाय. eKYC साठी मुदतवाढ दिली आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी मुदतवाढ ३१ डिसेंबरपर्यंत वाढवल

e-KYC न केलेल्या महिलांना मोठा दिलासा

मंत्री आदिती तटकरे यांची सोशल मीडियावरून माहिती

लाडक्या बहिणींना सुरू ठेवण्यासाठी e-KYC करणे अनिवार्य

राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी मोठी खूशखबर हाती आली आहे. लाडकी बहीण योजनेची E-KYC करणाऱ्या महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने e-KYC साठी मुदतवाढ ही ३१ डिसेंबरपर्यंत केली आहे. त्यामुळे e-KYC करणे बाकी असलेल्या लाडक्या बहि‍णींना पुरेसा अवधी मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

आदिती तटकरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट जशीच्या तशी

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.

परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT