Women Without Father or Husband Can Now Complete E-KYC saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! e-KYC बाबत शासनाचा मोठा निर्णय, अदिती तटकरेंचं ट्विट व्हायरल

Women Without Father or Husband Can Now Complete E-KYC: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढली. पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी पर्यायी कागदपत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

Bhagyashree Kamble

अल्पावधीतच घवघवीत यश मिळवणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आले. सध्या निकषात न बसणाऱ्या महिलांचे नाव यादीतून वगळण्यात येत आहे. ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थी महिलांना ई - केवायसीदरम्यान, पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. पण मग लाभार्थी महिलेला वडील किंवा पती नसेल तर? लाडकी बहीण योजनेतून मिळणारी आर्थिक मदत लाभार्थी महिलेला मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिली आहे.

ई केवायसीमध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत लाभार्थी महिला ई केवायसी करू शकतात. मात्र, ई केवायसी करण्यासाठी वडील किंवा पतीचे आधार कार्ड क्रमांक अनिवार्य आहे. यामुळे निराधार, एकल महिला, अविवाहित, ज्यांचे वडील नाहीत, अशा महिलांनी करावे काय? अशा लाभार्थी महिलांकडे कोणता पर्याय उपलब्ध आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी लाभार्थी महिलांनी केली होती. दरम्यान, अशा महिलांना लाभ मिळावा म्हणून शासनाने नवा मार्ग काढला आहे.

याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई- केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, किंवा घटस्फोट झालेला आहे. या लाभार्थी महिलांनी स्वत:चे ई केवायसी करावे. त्यांचे वडील किंवा पती यांच्यापैकी एकाचे अधिकृत मृत्यूप्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत, संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे', असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

'शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता तसेच अखंडितता कायम राहणार. ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी', असे आवाहन अदिती तटकरे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heels Crack in Winter: हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडतात? मग, रोज रात्री करा 'हा' सोपा घरगुती उपाय

Shocking : "बाबा हॉस्टेलमध्ये मला... " कोचिंग क्लासमध्ये १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

आम्ही मविआचा भाग नाहीत, राज-उद्धव यांची युती फिसकटली? मनसे नेत्याच्या भूमिकेनंतर चर्चांणा उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये अजित पवारांंच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT