ladki bahin yojana : Saam tv
महाराष्ट्र

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

ladki bahin yojana : राज्यात 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या... मात्र लाडक्या बहिणींनी लाभ मिळवण्यासाठी आता इतर योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे....अपात्र लाडकी इतर योजनांसाठी कशी धावाधाव करतायत... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Saam Tv

यामिनी महामुनकर, साम टीव्ही

लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या लाडक्या बहिणींना सरकारी लाभ काही सोडवत नसल्याचं उघड झालंय. कारण अपात्र लाडकींना आता पैशांसाठी एक भलतीच नामी शक्कल लढवलीय.. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला म्हणून काय झालं? या महिलांनी आता आपला मोर्चा सरकारच्या इतर योजनांकडे वळवलाय...सोलापूरात लाडक्या बहिणींनी निकषात बसत नसतानाही कसा लाभ घेतलाय... पाहा....

सोलापुरातील 15 हजार 530 महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आढळले...तर एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ देण्याचा नियम असताना, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या 1 लाख 13 हजार महिलांनी योजनेचे पैसे घेतले....त्यामुळे या एकूण 1 लाख 28 हजार 530 महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रशासनाने कायमचा बंद केलाय...

मात्र याच अपात्र महिलांचा डोळा आता इतर योजनांवर असल्याचं पाहायला मिळालयं...65 वर्षांवरील ज्येष्ठ लाडक्या बहिणींची पावलं आता ‘श्रावणबाळ’ योजनेकडे वळलेत, तर एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीनं थेट 'संजय गांधी निराधार योजने'साठी अर्ज दाखल केलेत..त्यामुळे लाडकीचे 1500 रुपये बंद झाल्यावर महिलांनी धीर सोडलेला नाही. उलट शासकीय नियमांचाच वापर करून पैसे मिळवण्याचा नवा मार्ग शोधून काढलाय...

सध्या सोलापूरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात महिलांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या महिला तिथे जाऊन "आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही" असे प्रमाणपत्र म्हणजेच 'एनओसी' (NOC) गोळा करतायत... कारण हेच एनओसी घेऊन महिला आता इतर योजनांसाठी अर्ज दाखल करणार आहे...त्यामुळे लाडकीला पर्याय म्हणून महिलांनी दोन टार्गेट केलेल्या दोन योजनांमधून महिलांना कसा फायदा होणार... पाहूया...

65 वर्षावरील वृद्ध महिला श्रावणबाळ योजनाचा लाभ घेण्यासाठी सज्ज झाल्या असून त्यांना दरमहा 1500 रुपये मिळतील... तर वयाची 65 पूर्ण न झालेल्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊन दरमहा 1500 रुपये मिळवण्याच्या तयारीत आहेत...

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करून तिजोरीवरील भार कमी करू पाहणाऱ्या राज्य सरकारला महिलांनी कायदेशीर रित्या शह देण्याचा प्रयत्न सुरू केलाय. योजना बदलली, नाव बदललं, पण शासनाच्या तिजोरीतून मिळणारे 1500 रुपये सोडायचे नसल्याचा निर्धारच अपात्र लाडकींनी केलाय. दोन वर्षांपासून सरकारचे पैसे लाटणाऱ्या या अपात्र लाडकींना सरकारी लाभ सोडवेना असंच दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT