Manasvi Choudhary
पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यापैकी एक म्हणजे रानभेंडी. रानभेंडी या भाजीला हुळी गोरी या नावाने देखील ओळखले जाते.
रानभेंडीची भाजी चवदार लागते. घरच्या घरी तुम्ही या भाजीची सोपी रेसिपी ट्राय करू शकता.
रानभेंडीची भाजी बनवण्यासाठी रानभेंडी, तेल, जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, हळद, मसाला, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हे साहित्य घ्या.
भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी रानभेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. रानभेंडीच्या भाजीला काटे असतात त्यामुळे ही भाजी काळजीपूर्वक स्वच्छ करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी याची फोडणी द्या. फोडणी दिल्यानंतर या मिश्रणात लसूण, हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्या. नंतर चिरलेली रानभेंडी तेलात मिक्स करा.
भेंडी शिजल्यानंतर त्यात हळद, मसाला आणि मीठ हे मसाले एकत्र करा. भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवा.
भाजी वाफेवर शिजली कि त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा. अशाप्रकारे गरमा गरम गावरान स्टाईल रानभेंडीची भाजी तयार होईल.