लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

Ladki Bahin Yojana Latest News Maharashtra 2026: ई-केवायसीच्या नावाखाली लाखो लाडक्या बहिणींची नावं योजनेतून वगळण्यात आलेत.... मात्र योजनेतून नाव वगळण्यावर विरोधकांनी थेट सरकारवर हल्लाबोल करत खळबळजनक दावा केलाय. हा दावा नेमका काय आहे? लाडकी बहिणी योजनेत किती लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात आलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Thousands of women protest after being removed from Ladki Bahin Yojana amid E-KYC verification drive.
Thousands of women protest after being removed from Ladki Bahin Yojana amid E-KYC verification drive.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

ई-केवायसीच्या नावाखाली लाडकी बहीण योजना बंद होणार? या योजनेला सरकारनं केवायसीची चाळण लावताच 80 लाख लाडक्या आपात्र ठरल्या आहेत. मात्र, आता याच अपात्र लाडक्या बहीणींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. अपात्रच नव्हे तर भविष्यात ही योजनाच बंद होऊ शकते असा खळबळजनक दावाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलाय. ते नेमकं काय म्हटले आहेत ते पाहूयात.

आज 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही.

- जयंत पाटील, राष्ट्रवादी(SP)

80 लाखचं नाही तर राज्य सरकारला आणखी 40-50 लाख लाडक्या बहिणींना कमी करायचं, असा आरोपही जयंत पाटलांनी केलाय. तर सरकारनं अपात्रतेची अनेक कारणं पुढे केली आहेत.

ऐन महागाईच्या तोंडावर बँक खात्यात येणारे 1500 रुपये बंद झाल्यामुळे 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलाय. मात्र या योजनेमुळे राज्याचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे पुढच्या काळातही सरकार कडक नियमांची चाळण लावून आणखी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणार की आता आहेत तेवढ्या लाडक्यांचा लाभ कायम ठेवणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com