Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana New Rules : लाडक्या बहिणींसाठी आता नवे नियम; इन्कम टॅक्सचीही असणार नजर, जाणून घ्या, VIDEO

Ladki Bahin Yojana update : लाडकी बहीण योजनेसाठी आता नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. एवढंच नव्हे तर सरकार इन्कम टॅक्स खात्याचीही मदत घेणार आहे. नवे नियम नेमके काय आहेत? आणि सरकार आयटीची मदत का घेणार आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Girish Nikam

लाडकी बहिण योजनेचे वार्षिक बजेट तब्बल 45 हजार कोटी आहे. हा आर्थिक डोलारा पेलणे राज्य सरकारला अवघड झालं आहे. राज्याच्या महसूल उत्पन्नाच्या 15 टक्के खर्च या योजनेवर होत असल्यानं इतर योजनांवर त्याचा परीणाम झालाय. म्हणूनच सरकारनं बोगस लार्भार्थ्यांना वगळण्याचं काम सुरु केलंय. त्यासाठी आता नवे नियम तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे.

या योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. आणि यामुळेच पाच लाखांनी घटलेली लाडकीची संख्या 10 ते 15 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सकाळ मीडिया ग्रूपच्या कार्यक्रमात व्यक्त केलीय.

'अपात्रतेची संख्या 10 ते 15 लाखांपर्यंत जाऊ शकते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांच दरवर्षी ई-केवायसीही करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूयात...

'लाडकी'वर आता आयटीची नजर

लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्स रेकॉर्डही तपासणार

दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई केवायसी करणं अनिवार्य

लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार

अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही

जिल्हास्तरावरून फेरतपासणी करुन निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार

यापूर्वीच अपात्र ठरलेल्या पाच लाख लाडकींमुळे राज्याच्या तिजोरीला साडे चारशे कोटींचा फटका बसलाय. आता पुन्हा तिजोरीवर भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं थेट इन्कम टॅक्सची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे लाडक्या बहिणींचं खरंखुरं उत्पन्न आता समोर येणार असून अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT