Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारचा मोठा निर्णय घेणार! लाडक्या बहिणींना ₹ ४०००० मिळणार ; अजितदादांचं वक्तव्य चर्चेत

New Scheme Under Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरु करण्यासाठी ३०-४० हजारांचं भांडवल दिलं जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. आता लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार नवीन योजना सुरु करण्याच्या विचारात आहे. यासाठीचा संपूर्ण प्लान अजित पवारांनी सांगितला आहे. काल अजित पवार नांदेडमध्ये बोलत असताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी नवा मास्टर प्लान काय? (New Scheme For Women)

लाडक्या बहि‍णींना त्यांचा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल देण्याचा विचार केला जत आहे. सरकार बँकांनी चर्चा करणार आहे. महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून ३० ते ४० हजार रुपये देण्याचा विचार केला जात आहे. या महिलांना दिले जाणारे १५०० रुपये बँकांकडे जमा होतील, असा हा प्लान आहे.

अजित पवार काय म्हणाले? (What Did Ajit Pawar says)

अजित पवार यांनी सांगितलं की, लाडक्या बहि‍णींना मला सांगायचं आहे की कधीकधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहि‍णींना दर महिन्याला १५०० रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही. या योजनेतून महिलांना मदत होते. आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे. यासंदर्भात बँकांशी बोलणं सुरु आहे.

काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत. १५०० रुपये महिलांना दिले जातात. त्याऐवजी ३० ते ४० हजार रुपये महिलांना द्यायचे. हप्ता लाडकी बहीण योजनेतून जाईल. जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. महाराष्ट्रातील काही बहि‍णींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Bengal Files OTT Release : थिएटरनंतर पल्लवी जोशीचा 'द बंगाल फाइल्स' ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

SCROLL FOR NEXT