Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, पण मागे हटता येईना! मंत्र्यांच्या कबुलीने खळबळ

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्याची कबुली मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. मात्र, आता या योजनेतून सरकारला मागे हटता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण आला आहे, मात्र या योजनेपासून आता सरकारला मागे हटता येणार नाही, अशी थेट कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी कोणीही सांगितले नसताना ही योजना सुरू केली आणि आता अनेक 'लाडक्या बहिणी' झाल्याने त्यांच्यापासून दूर जाता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक भारासोबतच आता राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने तिजोरीवरील ताण आणखी वाढला आहे. पाण्याचे संकट गडद झाल्यास विमानाने किंवा रेल्वेने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजनांसाठी मोठा निधी खर्च करावा लागेल, असेही ते म्हणाले. तरीही दुष्काळाचा सामना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही आणि सरकार यातून मार्ग काढेल, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.

'लाडकी बहीण' बाजूला करता येणार नाही

निवडणुकीपूर्वी आम्हाला कोणी सांगितले नव्हते, मात्र महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, असे झिरवाळ म्हणाले. आता या योजनेबाबत 'धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' अशी अवस्था झाली आहे. लाडक्या बहिणींना बाजूलाही करता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे आर्थिक परिस्थितीवर ताण आला असला तरी सरकार यातून नक्कीच मार्ग काढेल आणि कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि संबंधित नेत्यांच्या नेतृत्वात सरकार एका विचाराने काम करत असून कोणतीही अडचण येणार नाही, अशी खात्रीही त्यांनी दिली.

अन्नाचा दुष्काळ होता, मात्र आज अन्नाची टंचाई नाही

दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीवर बोलताना झिरवाळ यांनी १९७२ च्या दुष्काळाचा दाखला दिला. त्यावेळी अन्नाचा दुष्काळ होता, मात्र आज अन्नाची टंचाई नाही, तर पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असे ते म्हणाले. पिण्याचे पाणी रेल्वे किंवा विमानाने पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागेल. त्यासाठी त्यासाठी मोठा निधी लागेल. त्यामुळे यंदाच्या आणि पुढच्या वर्षातही काहीशी आर्थिक चणचण जाणवू शकते, असे मत त्यांनी मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : MSF जवानांवरील वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल; हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

Bigg Boss 20 : सलमान खानच्या 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्विस्ट! 'हा' सदस्य घराबाहेर, टॉप १० मध्ये कोणाला मिळाली जागा?

Tilak Varma: तिलक वर्माच्या शतकानंतरही पराभवाची नामुष्की का ओढवली? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं, वाचा!

Winter Ladoo Recipe : ना साखर, ना पाक करण्याची कटकट! हिवाळ्यात फक्त १० मिनिटांत बनवा खजूर-ड्रायफ्रूट्सचे लाडू

Accident: खासदाराच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, कार खड्ड्यात कोसळली; ५ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT