Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: निकषात बसते, e-KYC पण केली; तरीही ₹१५०० बंद झाले; लाडकीला हप्ता न येण्याचे खरं कारण काय?

Ladki Bahin Yojana KYC Update: लाडकी बहीण योजनेच्या हजारो लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. निकषात असून आणि केवायसी करुनदेखील महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

निकषात असून, केवायसी करुनही हप्ता जमा नाही

पैसे न येण्यामागचे कारण काय? अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. त्यामुळेच महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करुनही महिलांना पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, केवायसीमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पैसे थांबवले आहेत किंवा उशिराने येत आहेत, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावर आता महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निकषात बसत असूनही लाडकीला लाभ नाही, महिलांमध्ये नाराजी

लाडकी बहीण योजनेबाबत पौड गावातील एका ४८ वर्षीय महिलेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी स्वतः अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी मदत केली आहे. केवायसी करण्यासाठी मदत करुनही त्यांना त्याचे मानधन मिळालेले नाही. त्यांनी सांगितले की, मी खूपदा सरकारी ऑफिसच्या फेऱ्या मारल्या परंतु तिकडून काहीच उत्तर मिळालेले नाहीत. केवायसीमध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे, हे कुणीच सांगत नाहीये. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

लाभार्थी महिलेने केवायसीबाबत माहिती देताना सांगितले की, गावाखेड्यात ही अडचण पाहायला मिळत आहे. आम्ही सर्व निकषांमध्येही बसत असून तांत्रिक अडचणी सांगितल्या जात आहेत. कोणीच आम्ही केवायसीमध्ये नक्की काय चुक झाली याबाबत माहिती देत नाहीये, त्यामुळे अडचणी येत आहे.

लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत? अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. त्याआधी केवायसी करुनही अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. बहुतेक फॉर्म हे चुकीच्या पद्धतीने भरलेले आहेत किंवा तांत्रिक त्रुटी आहेत. ग्रामीण भागात NPCI मॅपिंगद्वारे आधार बँक लिंक हा अडथळा ठरत आहे. पडताळणीदरम्यान या चुका लक्षात येत आहेत. यामुळेही पैसे जमा होण्यास अडचणी येत आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. यातील सर्व त्रुटी दूर झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्रितपणे जमा केले जातील. खऱ्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT