सूरज मसूरकर , साम प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलीय. आता या योजनेवरून महायुतीमधील नेते एकमेकांच्या समोर आलेत. मतदानाचा आशीर्वाद दिला नाही तर आम्ही तुमच्या खात्यातून १५०० रुपये काढून घेऊ, असा विधान आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यावरून प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी राण यांना खडेबोल सुनावले आहेत.
एकीकडे लाडकी बहीण म्हणायची आणि दुसरीकडे धमकी द्यायची. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शुद्ध भावना पाहिजे. अशा वक्तव्यामुळे ही योजना बदनाम होत आहे. संविधानावर तलावर चालवतो की काय अशी आता परिस्थिती. पवित्र मतदानाला अपवित्र करण्याचं काम या वक्तव्यामुळे होत आहे. १५०० देतो तुम्ही मत आम्हांला द्या. लोकशाहीला मोठा धक्का आहे. या वक्तव्यामुळे संविधान धोक्यात येतंय. हे अहंकारी असून याचे परिणाम सरकारवर होणार आहे. सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार दिला आणि त्यांची योजना आणि पैश्यांच्या जोरावर मत वळवायची. लोकांच्या मनात द्वेष निर्माण होईल, असं हल्लाबोल आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा आणि सरकारवर केलाय.
कोणत्याच योजना कोणी बंद करत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केली. उद्धव ठाकरे यांनीही पण केली. योजना सोप्प्या असतात यातून दुहेरी फायदे असतो. पण शेतमाल भाव देणे कठीण आहे. कष्टकरांसाठी काही योजना आहेत का? श्रमावर आधारित काही योजना आहेत का? एखादा पेशंट अडचणीत सापडतो तेव्हा कोणत्याच योजना लागू होत नाही. अडचणींना धरून योजना असायला हव्यात असंही बच्चू कडू म्हणालेत.
काय म्हणाले होते रवी राणा
अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार रवी राणा यांनीही हजेरी लावली. या सोहळ्यात आगामी विधानसभा निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोठा इशारा दिला. 'आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे 3 हजार करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला ज्यांनी आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं विधान रवी राणा यांनी केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.