Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: बजेटनंतर लाडकीला मिळणार २१०० रुपये? भाजप मंत्र्यांनी तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारनं ही योजना सुरुच ठेवली. महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर १५०० वरून २१०० रुपये हफ्ता देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. हे २१०० रुपये कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत.

Priya More

गिरीष निकम, साम टीव्ही

लाडकी बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विरोधकांनी तर योजनाच बंद पडणार असं भाकित केलं होतं. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात वाढीव हफ्ता कधी मिळणार याची तारीखच भाजप मंत्र्यांनी सांगितली आहे. कधीपर्यंत लाडक्या बहिणींना हे २१०० रुपये मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत...

विधानसभा निवडणुकीआधी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर असा हल्लाबोल केला होता. ही योजना निवडणुकीनंतर बंद पडेल असाही आरोप होत होता. मात्र तसं काही झालं नाही. लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारनं ही योजना सुरुच ठेवली आहे.

मात्र २१०० रुपयांचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र अर्थसंकल्पानंतर मार्चमध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार असल्याचा पुनरूच्चार असं जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय.

विधानसभा निवडणुकीपूर्वी २१०० रूपयांवरून विरोधकांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली होती. सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यांना २१०० रुपयांचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात असलं तरी अद्याप तसा प्रस्ताव सरकारनं अजून तयार केला नाही.

या योजनेचा आर्थिक भार जास्त असल्यानं इतर विभागांच्या कामावर याचा परीणाम झालाय हे वास्तव आहे. असं असूनही लाडक्या बहिणींच्या कोपराला २१०० रूपयाचं गूळ वारंवार लावला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT