CM On Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील की नाही? शपथविधीनंतर योजनेबाबत काय म्हणाले CM फडणवीस?

CM On Ladki Bahin Yojana: राज्यात लोकप्रिय झालेली लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

Bharat Jadhav

महायुती सरकार सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत काय नवीन निर्णय घेणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. राज्यात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. इतकेच नाही तर लाडक्या बहिणींन २१०० रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी आता निकष कडक केले जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल १२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असल्याचं सांगितलंय. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांऐवजी महिलांना २१०० रुपये देऊ असे आश्वासन महायुतीनं प्रचारादरम्यान दिलं होतं.

आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सुतोवाच केले आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून महिलांना २१०० रुपये दिलं जाणार असल्याचं फडणवीसांनी परिषदेत सांगितलं. अर्थसंकल्पावेळी यासंदर्भात विचार करू. आमचे आर्थिक स्त्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार' असल्याचं फडणवीस म्हणाले. निवडणूक प्रचारादरम्यान जी आश्वसने दिली आहेत ती पूर्ण करू. ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू. तसेच निकषाच्या बाहेर कोणी भेटला , तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार ही केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

शेतकरी सन्मान योजनेतही आधी मोठ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत होता. हे जेव्हा सरकारच्या लक्षात आले तेव्हा अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं. आम्ही निकषात बसत नाही . त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल', पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचं कारण नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. ही गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळीणी केली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला होता त्या त्या सर्व महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता दिला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT