Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! १ लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरु असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय. सर्वच जिल्ह्यांमध्ये पडताळणीत हजारो अर्ज बाद होत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात एक लाख बहिणींचा लाभ बंद झालाय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचं टेन्शन वाढलंय. त्याला कारण ठरलंय...लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर तपासणी....राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्जांची निकषांनुसार पडताळणी केली जातेय. त्यामुळे नियम बाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरतायेत.

सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले. पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत. तसेच जिल्ह्यात 15 हजार 566 महिलांकडे चारचाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झाली आहे. त्यांचाही अर्ज बाद झाला आहे. त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे.

या योजनेचा अकरावा हप्ता मेअखेर वितरित होणार आहे. आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही. त्यांना ऑनलाइन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहिती नाही. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही, याची माहितीच समजत नाही. सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे.

राज्यात आतापर्यंत किती लाडकींचे अर्ज बाद झालेत ते पाहूया...

- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी - 2 लाख 30 हजार

- वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला - 1 लाख 10 हजार

- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - 1 लाख 60 हजार

- एकूण अपात्र महिला - 5 लाख

महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झाली आहे. मोठा निधी लाडकीकडे वळाल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर परीणाम झाला आहे. सरकारी तिजोरी रिकामी असल्यानं वाढीव 2100 रुपयांचा हफ्ता देण्याचा चकार शब्द सरकार काढत नाही. काटेकोर पडताळणीमुळे आगामी काही महिन्यात लाडकीची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT