Ladki Bahin Yojana prahaar .in
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे बँकांवर ताण; केवायसी पूर्ण करण्यासाठी बहिणींची धावाधाव

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मोठी धावपळ करावी लागत आहे. बँकेतील केवायसी पूर्ण करण्यासाठी अर्जदारांची मोठी पळपळ होतेय. दरम्यान योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा लोड वाढलाय.

Girish Nikam

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीय. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरु आहे. पाहूया एक रिपोर्ट.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यावर दोन हप्ते असे एकूण 3000 रुपये जमा झालेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच बँका आणि पोस्टात महिलांची गर्दी वाढलीय. काही बहिणी पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्यास असल्याचं पाहायला मिळतंय. तर काहींची केवायसी पूर्ण करण्यासाठी धावाधाव सुरूंय. आधीच बँकेत स्टाफ कमी, त्यात महिलांची संख्या जास्त. त्यामुळे लाडक्या बहिणींना तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय. गर्दीला आवरणंही बँक कर्मचाऱ्यांना अवघड होत असल्यानं बँकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलंय. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होतीय.

पैसे जमा होताच बँकांसमोर महिलांची अक्षरशा झुंबड उडाली होती. विदर्भात अमरावतीसह वाशिममध्ये पैसे काढण्यासाठी भर पावसात महिला रांगेत उभ्या होत्या. यवतमाळमध्येही शहरातील सर्वच एटीएमवर गर्दी पाहायला मिळतेय. तिकडे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या बँकेसमोर तर लाडक्या बहिणींचा रात्रभर मुक्काम होता. KYC करायला आणि योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकेसमोर रात्र जागून काढली. अनेक महिलांचं बँक अकाऊंट आणि आधार कार्ड लिंक नाही. त्यामुळे घरबसल्या आधार कसं लिंक करायचं ते समजून घेऊया?

1. सर्वात आधी NPCI म्हणजे National Payments Corporation of India च्या अधिकृत संकेतस्थळावर जा

2. कंझ्युमर या ऑप्शन वरती क्लिक करा

4. त्यानंतर भारत आधार सीडींग या ऑप्शनवरती क्लिक करायचं

5. आता तुमच्यासमोर आणखी नवे पेज येईल. त्यावर आधार क्रमांक टाका. खाली रिक्वेस्ट फॉर आधार ला सीडींग या पर्यायावर क्लिक करा.

6. त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आहे. खाली फ्रेश सिंडींग वर क्लिक करायचे आहे.

7. बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँकसोबत लिंक करू शकता. सध्या गर्दीमुळे सर्वच बँकांवर ताण वाढलाय. याचा परिणाम बँकांच्या दैनंदिन कामकाजावरही होतोय. आता गर्दी नियंत्रणावर मुख्यमंत्री काय तोडगा काढतात, हेच पाहायचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये शिवसेना मनसेची युती होणार का?

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT