Ladki Bahin Yojana 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 92 लाख लाडकींचा हप्ता बंद; अपात्र लाडकींकडून पैसे वसूल करणार?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांची नावं वगळण्यात आलीय. अपात्र लाडक्यांनी सरकारच्या तिजोरीतून तब्बल १४ हजार कोटींवर डल्ला मारलाय. आता या बोगस लाडक्यांकडून पैसे वसूल केले जाणार का? पाहूया एक रिपोर्ट.

Bharat Jadhav

लाडकी बहिण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे या योजनेचा भार पेलवला जात नाही. त्यामुळेच काटेकोर निकष लावून योजनेत घुसलेल्या अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर आहे. ई-केवायसी न करणं, नियमापेक्षा जास्त उत्पन्न असणे, वयाची अट अशा कारणांमुळे लाभार्थी संख्येत मोठी घट झालीय.

लाडकी बहीण योजनेतील 92 लाख महिलांची नावं वगळली

वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या एकट्या बीड जिल्ह्यातील

e-KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 55 लाख नावं कमी

2.4 कोटी लाभार्थी संख्येच्या तुलनेत एकूण लाभार्थ्यांमध्ये 38% घट

अपात्र लाडक्या बहिणीनी 14 हजार कोटी लाटले

योजनेच्या वाढत्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल, कॅगचा इशारा

मतं मागताना महिला जाब विचारतील असा टोला काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना लगावलाय. तर लाभ घेणाऱ्या अपात्रांकडून पैसे वसुल करा, अशी मागणी ठाकरे सेनेने केली. तर योजना सुरुच राहिल अशी ग्वाही देताना महिला व बालकल्याण मंत्र्यांनी योजनेची सद्यस्थिती सांगितली. या योजनेसाठी राज्य सरकारने २६,५०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. मात्र सुमारे दोन वर्षांत अपात्र लाभार्थ्यांनी सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा डल्ला मारला आहे. सरकारला लुटणाऱ्यांकडून पैशांची वसुली होणार का ? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागरिकांवर पॅलेट गन कशी चालवू शकता? सर्वाच्च न्यायालयानं सुनावलं; नवे नियम करणार लागू?

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष, चिन्हावर उद्या होणार सुनावणी

Daily Walnut Benefits: फक्त ४-६ अक्रोड रोज खा; शरीराला मिळतील हे ७ जबरदस्त फायदे

Beed Crime: बीड हादरले! वकिलावर लोखंडी रॉड अन् दगडाने हल्ला, हॉटेल मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; १०-१२ किलोमीटर वाहनांच्या रांगा, VIDEO

SCROLL FOR NEXT