laddu, pandharpur news, pandharpur vitthal mandir, Ashadhi wari 2022 News
laddu, pandharpur news, pandharpur vitthal mandir, Ashadhi wari 2022 News saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari: विठ्ठलभक्तांनाे! लाडू प्रसाद महागला; जाणून घ्या नवा दर

भारत नागणे

पंढरपूर (pandharpur latest marathi news) : विठ्ठल रुक्मिणीच्या (vitthal rukmini) दर्शनासाठी येणारे हजारो भाविक पंढरपुरात (pandharpur) घरी जाताना विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू (laddu) नेतात. या लाडूची विक्री मंदिर समितीच्या वतीने करण्यात येते. यंदा लाडूच्या दरात पाच रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. कच्चा मालाचे दर वाढल्याने लाडूचे दर वाढविल्याची माहिती मंदिर समितीतर्फे (vitthal rukmini mandir) गहिनीनाथ महाराज औसेकर (सह अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) यांनी दिली. (laddu prasad price hike at vitthal rukmini mandir near pandharpur)

कोरोनामुळे सध्या लाडू प्रसादाची विक्री बंदी आहे. दरम्यान आषाढी यात्रेच्या (ashadhi wari) तोंडावर पुन्हा लाडू प्रसाद विक्री करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्याबरोबरच मंदिर समितीने साखर, तेल, डाळीसह मजूरी दरात वाढ झाल्याने लाडू प्रसाद विक्रीच्या दरात ३५ ते ४० टक्के इतकी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना १४० ग्रॅम वजनाच्या दोन‌ लाडूसाठी २० रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे भाविकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

यापुर्वी लाडू १५ रूपयांना मिळत असे. यंदापासून त्याची किंमत २० रूपये केली जाणार आहे. वाढत्या महागाईचा फटका विठुरायांच्या भक्तांना देखील बसला आहे. दरम्यान यंदापासून भाविकांना १४० ग्रॅम वजनाचे दोन‌ लाडू दिले जाणार आहेत असे गहिनीनाथ महाराज औसेकर (सह अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

SCROLL FOR NEXT