krishna river, sangli news, ganeshotsav 2023, ganesh visarjan 2023 saam tv
महाराष्ट्र

Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनाचा तिढा सांगली जिल्हा प्रशासन साेडवणार?

Ganesh Festival 2023 : कृत्रिम कुंड, तलावातच गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

विजय पाटील

Sangli Ganpati Utsav : कृष्णा नदी कोरडी पडल्याने जत तालुक्यातील पूर्व भागातील लोकांनी तलावांमध्ये पाणी सोडावं अन्यथा गणरायच्या मूर्ती कोरड्या तलावात ठेवण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे. प्रशासनाने पाणी न साेडल्यास गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न उभा ठाकण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. (Maharashtra News)

दीड दिवसाच्या गणपतीचे बुधवारी आहे त्या पाण्यात गणेशभक्तांनी विसर्जन केले. आता पाच दिवसांचे गणपती आणि सांगली गणपती पंचायतन संस्थानच्या गणपतीचे कुठे विसर्जन करायचे अशी चर्चा हाेत आहे. पूरेशा पाण्याअभावी सातवा, नववा आणि अकराव्या दिवशीच्या गणपतीच्या विसर्जनाचा प्रश्न निश्चित उपस्थित हाेणार असे ग्रामस्थांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड, तलावाची व्यवस्था केली आहे. नदी पात्रात पाणी कमी असल्याने या कृत्रिम कुंड, तलावातच गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

दुसरीकडे जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावातील तलावांमध्ये पाणी सोडावं, अन्यथा गणेशमूर्तीचे विसर्जन न करण्याचा इशारा त्या भागातील नागरिकांनी दिला.

जत तालुक्यातील सोन्याळ जवळ मायथळ येथून म्हैसाळ सिंचन योजनेतुन पाणी जात आहे मात्र शेजारी असणाऱ्या तलावात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे तलावात पाणी सोडले नाही, तर यंदा गणेश मूर्ती विसर्जन न करता गणरायाच्या मूर्ती कोरड्या तलावात तशाच ठेवणार असे तुकाराम महाराज (अध्यक्ष, पाणी संघर्ष समिती ,जत) यांनी देखील नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT